जिल्हा परिषद कार्यालय समोर २९ एप्रिल पासून सुरु आहे साखळी उपोषण
अमरावती प्रतिनिधी
आदिवासी समाज विकास संघटना कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा विविध मागण्यासाठी २९ एप्रिल पासून साखळी उपोषण सुरु आहे. ज्यामध्ये पेसा कायद्याअंतर्गत कंत्राटी शिक्षक पदभरती तात्काळ करण्याबाबत, ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत मागण्या असून आज ३ दिवस लोटले असताना देखील प्रशासन दिरंगाई करीत आहे जेव्हा कि, पेसा कायद्याअंतर्गत कंत्राटी शिक्षक पदभरती पालघर, नाशिक, रायगड, जिल्ह्यामध्ये झाली आणि तेथील मुख्याधिकारी यांनी नियुक्त्या सुद्धा दिल्या. परंतु अमरावती जिल्ह्यातील मुख्याधिकारी यांनी कोणतेही ठोस पावले उचलले नसल्याकारणाने त्यांच्या विरोधात आज महाराष्ठ्र दिनी ठीक ५ वाजता जिल्हापरिषद कार्यालयासमोर डिग्री जलाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे मत संघटनेच्या वतीने दिलेले आहे.














Add Comment