शिक्षकांसह मुख्याध्यापक व माजी मुख्याध्यापक यांची प्रमुख उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी
दिनांक १ मे महाराष्ट्र दिनी शहीद स्मारक उच्च माध्यमिक विद्यालय यावली शहीद येथे स्नेह संमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल २६ वर्षानंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक घोगरे सर माजी मुख्याध्यापक ठाकरे सर, खवले सर सह शिक्षकांमधून रामटेके सर, नितीन यावलीकर सर, भैया गुजरकर सर, मंगला मॅडम, विष्णुपंत आवलेकर सर, गोटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रमुख उपस्थिती मान्यवर यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता १० वी म्हणजे मानवाच्या जीवनाला आकार देणारे वर्ष त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी विध्यार्थी आपापला मार्ग निवडत असताना अनेक वर्ष एकमेकांच्या सहवासात असलेले मित्र मैत्रिणी यांची ताटातूट होते. मात्र शहीद स्मारक उच्च माध्यमिक विद्यालय यावली शहीद येथे घेण्यात आलेल्या स्नेह संमेलनात २६ वर्षानंतर पुन्हा १० वी चा वर्ग पुन्हा भरविल्याने जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.
Add Comment