धामणगाव रेल्वे

बुधवार बाजारात मोकाट जनावरांचा धुमाकूळ; सांड च्या हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी

मोकाट जनावराच्या बंदोबस्ताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

धामणगाव रेल्वे 

बुधवार बाजार परिसरात मोकाट फिरणाऱ्या गायी-बैलांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज एका मोकाट सांडने अचानक एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला शिंगावर उचलून फेकल्याची घटना घडली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

बाजार परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढत असल्याने नागरिक, व्यापारी, ग्राहक तसेच पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी अशा जनावरांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेनंतर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी होणार? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न सर्व सामन्यांना पडला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!