तहसीलदार अभय घोरपडे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाची कारवाई
धामणगाव रेल्वे
तहसीलदार अभय घोरपडे यांच्या आदेशानुसार दि. ३१ ऑक्टो रोजी महसूल पथक गस्ती वर असताना सोनालिका कंपनीचा नवीन निळया रंगाचा आणि लाल रंगाची ट्रॉली मध्ये अवैध काळी रेती वाहतूक करताना आढळून आला. सदर रेतीचा परवाना विचारला असता कोणतीही पूर्तता करण्यात आली नसल्याने मौजा बोरगाव निस्ताने ते झाडा रोडवर सोनोरा काकडे फाट्यावर मंगेश सुखलाल ठाकरे रा. मंगरूळ दस्तगीर याचा ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.














Add Comment