अमरावती

नगराध्यक्षा अर्चना अडसड – रोठे यांच्या वाढदिवसानिम्मित मोफत महाआरोग्य शिबीर नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

लॉयन्स क्लब (एलिट) पाणी पुरवठा सभापती विलास बुटले मित्र परिवाराचे दत्तापूरात आयोजन

धामणगाव रेल्वे –

दिनांक २४ एप्रिल रोजी नगराध्यक्ष अर्चना अडसड – रोठे यांच्या वाढदिवसा निमित्त लॉयन्स क्लब ईलाईट व पाणी पुरवठा सभापती विलास बुटले मित्र परिवार यांच्या वतीने सकाळी मोफत महाआरोग्य शिबिराचे दत्तापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तज्ञ डॉक्टर निःशुल्क तपासणी करतील हृदय रोग तज्ञ, स्त्रि रोग तज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ दंतरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ व इतर तज्ञ डॉक्टर मंडळी रुग्णांची तपासणी करुन रोग निदान करणार आहे या शिबिरात रुग्णांना उपलब्धतेनुसार मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. मोतिया बिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांचे नेत्र शस्त्रक्रिया अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णात करण्यात येईल.
हृदय व मधु मधुमेह विकार तज्ञ डॉ आकाश येंडे डॉ. असित पसारी बालरोग तज्ञ अमित गुल्हाने, जनरल फिजिशियन सर्जन डॉ .अमित कारमोरे, दंतरोग तज्ञ डॉ हार्दिक पटेल, डॉ महेक अग्रवाल, नेत्ररोग डॉ मिलिंद सूर्यवंशी, डॉ.सविता अप्तुरकर, डॉ.प्रतिज्ञा मेश्राम डॉ.संदीप दुबे डॉ. प्रविणा देशमुख डॉ. सांगली खडसे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.कांचन रहांगडाले तालुका आरोग्य अधिकारी विवेक सुदेवाड यांची उपस्थिती राहणार आहे
या आरोग्य महा शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिर संयोजक पाणीपुरवठा सभापती विलास बुटले, लायन्स क्लबचे प्रमोद कुचेरिया, लॉ चेतन कोठारी, लायन्स क्लब ईलाईटचे अध्यक्ष लॉ जितेंद्र चौधरी, कुंदन ठाकूर, निवृत्ती लोखंडे, लॉ गोपल लोदे, नगरसेवक अंशुल बडगया, स्वप्नील ठाकरे, चेतन कट्यारमल यांनी केले आहे…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!