अमरावती

सरकारकडे २ कोटी 50 लाखाच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी संपविले जीवन ?

कर्जाचा वाढता बोजा, सरकारकडे 2 कोटी 50 लाखांचं बिल प्रलंबित, वर्षभरापासून मंत्रालयात चकरा, आणि अखेर अमरावतीत कंत्राटदारानं उचललं टोकाचं पाऊल

अमरावती प्रतिनिधी

जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जरुड येथील कंत्राटदार सुनील वागद्रे (वय 42) यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुनील वागद्रे यांच्यावर खाजगी बँकेच 30 लाख, बँकेची सी सी 30 लाखांची तर बांधकामासाठी उसने घेतलेले 50 लाख रुपयांचे कर्ज होते. सरकारकडे 4 वर्षापासून 2 कोटी 50 लाख रुपयांचे बिल प्रलंबित आहे. गेल्या एका वर्षापासून ते मंत्रालयात चकरा मारत होते. पण काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहे.

शासनाच्या चुकीच्या आणि असमान निधी वाटप धोरणामुळे नैराश्यातून जीवन संपवल्याचा आरोप

अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटना यांनी कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी शासनाच्या चुकीच्या आणि असमान निधी वाटप धोरणामुळे नैराश्यातून जीवन संपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, थकीत देयके त्वरित अदा करणे, सुनील वाघद्रे यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी शासनाने स्वीकारावी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांची सर्व थकीत देयके तात्काळ, कोणत्याही विलंबाशिवाय देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!