धामणगाव रेल्वे

सरपंच, सचिव आणि ठेकेदारांनी लुटली “गव्हानिपाणी” ग्रामपंचायत

चौकशी अहवालात धक्कादायक सत्य उघड – ठेकेदाराला काम पूर्ण व्हायच्या आधीच दिले जास्तीचे पैसे 

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील गव्हानिपाणी ग्रा.प. मध्ये सरपंच, सचिव आणि ठेकेदाराच्या संगनमताने मनमानी कारभार करीत ग्रामपंचायत चा निधी परस्पर लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चौकशी अहवालातून हा प्रकार उघडकीस आल्याने ग्रा. प. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.
तक्रारकर्ते प्रमोद बुराडे यांनी पाडला सरपंच सचिवांचा भ्रष्टाचारी चेहरा उघड
गव्हानिपाणी गावातील प्रमोद बुराडे या तक्रारकर्त्याने गावात करण्यात आलेल्या कामाच्या बाबतीत गटविकास अधिकारी यांच्याकडे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये १) १५ वित्त आयोगातील नवीन नालीचे बांधकाम २) पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईन ३) जि. प. शाळेतील मुत्रीघर दुरुस्ती अशा तीन कामाचा सामावेश असून यामध्ये काम पूर्ण न करताच निधी ठेकेदाराला देण्यात आला असून झालेले काम सुद्धा नित्कृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप होता.

चौकशी अहवालात धक्कादायक बाबी उघड

सदर प्रकरणाची विस्तारअधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून त्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. ज्यामध्ये नवीन नालीच्या बांधकामासाठी ३ लक्ष रुपये निधीचे प्रकलन तयार करण्यात आले असून ते काम ग्रा.प. मार्फत २३ जानेवारी २०२६ रोजी अवधूत महाराज कन्स्ट्रक्शन च्या प्रो. पा देण्यात आले होते. दरम्यान काम पूर्ण होण्याच्या आधीच ११ फेब्रुवारी २०२६ ला एकाच दिवशी ९० हजाराचे ३ देयके ठेकेदाराला देण्यात आले. जेव्हा कि, ग्रा. प. ला काम पूर्णत्वाचा दाखला रक्कम २, ४१,०६८ रुपये २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झाला. महत्वाचे म्हणजे काम पूर्णत्वाचा दाखला २, ४१,०६८ रुपये असून काम पूर्ण होण्याच्या दोन आठवडे अगोदरच २,७०,००० देऊन २८,९३२ रुपये जास्तीचे देण्यात आले.
पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईन कामाचे प्रकलन १,५३,६६३ रुपये असून हे काम सुद्धा अवधूत महाराज कन्स्ट्रक्शन च्या प्रो. पा. ला १० डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आले होते. या कामाचा पूर्णत्वाचा दाखला रक्कम १,४८,२०४ रुपये २८ मार्च २०२५ प्राप्त असून ठेकेदाराला एकाच दिवशी ६०,००० चे ३ देयके म्हणजे १,८०,००० अदा करण्यात आले. म्हणजेच चक्क ३१,७९६ रुपये जास्तीचे देण्यात आले आहे.

तसेच जि. प. मुत्रीघर दुरुस्ती या कामात सुद्धा कामाचे प्रकलन १,२९,०२६ रुप्याचे असून ठेकेदाराला १,२९,३६१ रुपये देण्यात आले यामध्ये सुद्धा ३३५ रुपये जास्तीचे अदा करण्यात आले. एकंदरीत तीनही कामात शासकीय कपाती करून खाती भरणे अभिप्रेत असतानातसे करण्यात आले नाही त्यामुळे सर्व कामात अनिनियमितता झाली असून त्याला सर्वस्वी जबाबदार सरपंच तथा सध्यस्थित प्रशासक आणि ग्रा. प. सचिव जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच एकंदरीत कामापेक्षा ६१,०६३ रुपये जास्तीचे देण्यात आले असून ती रक्कम वसूलपात्र असल्याचे नमूद आहे.

ग्रा.प. ने कामाची प्रसिद्धीच केली नसून परस्पर ठेकेदाराला दिले काम

गव्हानिपाणी ग्रा. प. पूर्णपणे भोंगळ कारभार सुरु असताना सदरच्या कामाचे कोणतेच पेपर रोस्टर न घेता ते परस्पर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला दिल्याचे दिसून येत आहे. म्हणजे पूर्णपणे नियम धाब्यावर बसवीत मनमानी पद्धतीने ठेकेदाराचे खिशे भरण्याचे काम गव्हानिपाणी ग्रा. प. च्या अधिकारी आणि तत्कालीन सरपंचाने केले आहे. त्यामुळे या तीन कामाची तक्रार केली म्हणून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याने पूर्ण ५ वर्षात झालेल्या कामातसुद्दा मोठा भ्रष्टाचार असल्याची चर्चा सुद्धा गव्हानिपाणी गावात रंगली असून सरपंच तसेच ग्रामसचिव यांनी पूर्ण खाते चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!