धामणगाव येथील निर्मल उज्वल बँक चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर ?
धामणगाव रेल्वे –
येथील निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. मध्ये काही महिण्यापुर्वी ग्राहकांचे तारण ठेवलेले सोने परस्पर लंपास केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बँक चर्चेत आली आहे. ती म्हणजे ग्राहकांना आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने चक्क बँक मधेच जवळपास ३० ठेवीदारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कष्टाची रक्कम भविष्यात आपल्या कामी पडणार या विश्वासाने बँकेत ठेवी म्हणून ठेवली असताना ठेवी ( एफ डी ) चा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पैसे परत करण्यात बँकेकडून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला तर काहींच्या मते सेविंग खात्यामधील विड्रॉल देण्यासही बँक असमर्थ असल्याचे सांगण्यात आले.















Add Comment