धामणगाव रेल्वे

धामणगावात तालुक्यात अतिक्रमणधारकांना मिळाले हक्काचे पट्टे – शासन निर्णयाची अंमलबजावणी

आमदार, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते जमिनी पट्ट्याचे वितरण

धामणगाव रेल्वे

महाराष्ट्र शासनाच्या दि. २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार ०१ /०१ /२०२६ पूर्वीचे पात्र निवासी अतिक्रमणधारकांना जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण कार्यक्रम दि. १५ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय अंजनसिंगी तालुका-धामणगाव रेल्वे, जिल्हा- अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपाली गायकवाड (प्रशासक) ग्रामपंचायत कार्यालय अंजनसिंगी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते एकूण ८ पात्र अतिक्रमणधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.

८ पात्र अतिक्रमणधारकांना मिळाले हक्काचे पट्टे  

यावेळी मान्यवरांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पात्र अतिक्रमणधारकांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क प्राप्त होत असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील ईतर पात्र अतिक्रमण धारक लाभार्थीना देखील परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास सांगितले त्यामुळे इतर लाभार्थींचे देखील अतिक्रमण नियमानुकुल करता येईल असे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्ग 

यावेळी तहसीलदार अभय घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे, विस्तार अधिकारी (कृषी) शुभम खंडेझोड, (पंचायत) प्रल्हाद तेलंग, नीलेश वाघ, गट समन्वयक विशाल सुटे, आरोग्य सहाय्यक मनोज सरदार, तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार ऋतुराज पटोरकर, प्रफुल्ल देशमुख, महसूल मंडळ अधिकारी नीलिमा गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी नीलेश ढोरे, ग्रामपंचायत सचिव राजू अहेरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सुटे (गट समन्वयक) यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी पंचायत समिती धामणगाव रेल्वे व तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!