धामणगाव रेल्वे

दत्तापूर पोलिसांचा शास्त्री चौकात ठिय्या – अल्पवयीन चालकांवर कारवाईचा बडगा

सहाय्यक पो. निरीक्षक गजानन गजभारे ऍक्शन मोडवर

धामणगाव रेल्वे –

        शालेय वर्ग सुरु झाल्यापासून शहरात अक्षरशः अल्पवयीन दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातला असताना नियमांना पायदळी तुडवीत चक्क प्रशासनालाच आव्हान दिले होते. मात्र दत्तापूरचे नवनियुक्त ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पो. निरीक्षक गजानन गजभारे यांनी आपल्या चमू सह शास्त्री चौकात ठिय्या देऊन नियमांना पायदळी तुडवणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शास्त्री चौकात अनेक अल्पवयीन तसेच ट्रिपलशीट वाहचालकावर कारवाई करीत असताना पोलीस प्रशासन दिसत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांची गाडी थेट पोलिसस्टेशन ला लावण्यात येत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
कारवाई करतेवेळी सहाय्यक पो. निरीक्षक गजानन गजभारे स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांच्यासोबत पुसदकर महिला अधिकारी वाहतूक पोलीस रवी पाखरे,  नवनाथ खेडेकर सह त्यांची टीम उपस्थित होती.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!