धामणगाव रेल्वे

अखिल भारतीय शिक्षक संघाच्या शिक्षण परिषद व भव्य त्रैवार्षिक अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांच्या विचारमंथनातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प! ; प्रेरणादायी व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

 शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा केंद्रबिंदू असून, बदलत्या शैक्षणिक प्रवाहासोबत शिक्षकांनीही सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक आहे.शिक्षकांच्या विचारमंथनातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प करीत अखिल धामणगाव रेल्वे तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण परिषद व भव्य त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे (आक्का) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष किरण पाटील होते.

यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, बांधकाम समिती सभापती मंजिरी भोगे, माजी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड, गौतम गजभिये, मोहन देशमुख, शिक्षक भारतीचे मंगेश खेरडे, बँकेचे माजी संचालक मनोज चोरपगार, जिल्हा सरचिटणीस सुभाष सहारे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय साखरे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक चव्हाण, राजेंद्र होले, जिल्हा सहकोषाध्यक्ष अरुण चव्हाण यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पवन बोके यांनी केले. कार्याध्यक्ष दिनेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले, तर कोषाध्यक्ष उमेश आडे यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय सरचिटणीस सचिन वाकेकर यांनी करून दिला. गुणवंत व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव परिषदेदरम्यान उपक्रमशील, गुणवंत, प्रेरणादायी व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा गुणगौरव करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शैक्षणिक गुणवत्तावाढीवर विचारमंथन परिषदेत शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, शिक्षकांच्या विविध समस्या, शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अध्यापन पद्धतीत आवश्यक बदल करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये, संस्कार व सामाजिक जाणीव रुजविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्त्यांचे तालुका सरचिटणीस श्री. सचिनजी वाकेकर यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

“एक ध्येय—गुणवत्तापूर्ण शिक्षण; एक संकल्प—विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” या विचाराने अधिवेशनाची सांगता झाली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!