धामणगाव रेल्वे

सर्वसामान्य कुटुंबाला एकाच महिन्याचे वीजबिल ५१ हजाराच्या वर ; स्मार्ट मीटरचा स्मार्ट धक्का !

पिंपळखुटा येथील राऊत कुटुंबाला स्मार्ट मीटर ने आणले अडचणीत

धामणगाव रेल्वे

शहरात स्मार्ट मीटर ला विरोध असताना महावितरण अधिकारी कर्मचारी हे स्मार्ट मीटर फायदेशीर असल्याचे वारंवार सांगतात आणि विविध ठिकाणी त्यांच्याकडून स्मार्ट मीटर लावण्याची सक्तीसुद्धा सर्रास सुरु आहे. मात्र तालुक्यातील पिंपळखुटा येथील राजेश राऊत यांच्या कुटुंबाला या महिन्याचे वीजबिल पाहून धक्काच बसला आहे. राजेश राऊत यांच्या घरी गेल्या ६ महिण्यापासून स्मार्ट मीटर क्र. ३६८२५६०२९३२१ लावल्यापासून दर महिन्याला ७०० ते ८०० रुपये वीजबिल येत होते मात्र या महिन्यात त्यांना चक्क ५१ हजार ९१० रुपये वीजबिल आल्याने स्मार्ट मीटर चा स्मार्ट धक्काच बसला आहे.

तपासणी करिता बसविण्यात आलेले डमी मीटर

  ६ महिन्याचे मीटर रिडींग २६० असून मागच्या एकाच महिन्यात २४७८ युनिट वापरल्याचा प्रताप राऊत यांच्या घरच्या स्मार्ट मीटर ने दाखविला आहे. त्यामुळे राजेश राऊत यांनी महावितरण कार्यालयात सदर विषय सांगितला असता त्यांना तपासणीसाठी डमी मीटर दिला असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचेही राजेश राऊत यांनी सांगितले. मात्र सर्व सामान्य कुटुंबाला एका महिन्याचे ५१ हजार वीजबिल येणे म्हणजे कंबरडे मोडण्यासारखेच वास्तव आहे. एवढे वीजबिल भरणे शक्यच नाही, त्यामुळे सदरच्या प्रकरणाला महावितरण अधिकाऱ्याकडून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!