धामणगाव रेल्वे

महिलेला कथित मारहाण प्रकरणात वादग्रस्त सरपंच पराग राऊत यांच्या अडचणी वाढणार ?

धामणगाव रेल्वे

जळका पटाचे सरपंच पराग राऊत हे गेल्या काही महिन्यापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे चित्र समोर असून नुकत्याच काही दिवसा अगोदर एका महिलेला कथित मारहाण प्रकरणाने सरपंच पराग राऊत याच्यावर तळेगाव द पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. त्यामुळे सरपंच पराग राऊत यांच्या वादामध्ये आणखी भर पडली आहे.

तक्रारकर्त्या महिलेची न्यायासाठी एस पी कडे धाव ?

खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३० ऑगस्ट रोजी सरपंच पराग राऊत यांनी एका महिलेला कथित मारहाण करीत महिलेचा हात पिरगाळून ढकलून देत मर नाही तर काही कर असे म्हटले तसेच गेल्या ५ महिन्यापासून सरपंच मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद असताना सरपंच पराग राऊत यांच्यावर तळेगाव द पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने तक्रारकर्ती महिला न्यायासाठी एस पी यांना भेट देऊन न्यायाची मागणी करणार असल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे सरपंच पराग राऊत यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरपंच पराग राऊत यांच्यावर यापूर्वी ही गंभीर गुन्हे दाखल ?

वादग्रस्त सरपंच पराग राऊत याची महिलेला कथित मारहाण ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही विनयभंगासारखा गंभीर गुन्हा सरपंच पराग राऊत यांच्यावर दाखल असून ते प्रकरण विद्यमान न्यायालय धामणगाव रेल्वे येथे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे सरपंच पराग राऊत यांच्या मनात महिलेविषयी किती आदर आहे याचा प्रत्यय समोर येतो…

क्रमशः

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!