धामणगाव रेल्वे

बोरकरी नाल्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मंगरूळ दस्तगीर येथे पुन्हा ‘सामूहिक प्राणांतिक आणि आमरण उपोषण’ सुरू

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनंतरही काम न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सुरु केले उपोषण

धामणगाव रेल्वे

मंगरूळ दस्तगीर अंतर्गत बोरकरी नाल्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागावा आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज, १ जून २०२६ पासून नागरिकांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत सामूहिक प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतरही बोरकरी नाल्याची समस्या न सोडविल्याने प्रशासनाच्या वारंवार दिलेल्या पोकळ आश्वासनांना कंटाळून हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

​मुख्य मागण्या:

​पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती : – पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून शेतात पावसाचे पाणी शिरणार नाही, याकरिता तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी.
नुकसान भरपाई:- मागील वर्षी पूरसदृश कामकाजामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची रक्कम निश्चित करून सर्व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.
​अधिकाऱ्यांची चौकशी:-  आजवर नमूद घटलेल्या घटनेच्या संदर्भाने हलगर्जीपणा करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची सेवा पुस्तिकेत नोंद घेण्यात यावी.
​प्रशांत रमेशराव खंडारे यांच्या नेतृत्वाखाली १ मे २०२६ पासून ‘आमरण उपोषण’ आधीच सुरू आहे, तर आजपासून सुरू झालेल्या ‘सामूहिक प्राणांतिक उपोषणात’ प्रशांत खंडारे, उमेश खांडेकर, अभिलाष लोमटे, राहुल लोमटे, उमेश मारोडकर, सुधाकर मोरे, पंकज खंडारे, उमेश शिसोदे, बंडू पचारे, विजय धोबे, एकनाथ भेदकर, गजानन खांडेकर, बबन महात्मे आणि सुरेशराव गोडसे या नागरिकांचा समावेश आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!