धामणगाव रेल्वे

धामणगाव कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये नवीन मका खरेदीचा शुभारंभ

मक्याला मिळाला २०११ रुपये भाव

धामणगाव रेल्वे

               येथील कृषि उत्पन्न बाजार समिती ने तीळ, ज्वारी, मुंग, सोयाबीन, तुर, चना, गहु या शेतमालाची मोठी बाजार पेठ उपलब्ध करुण दिल्यामुळे परिसरातील रब्बी पिके उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून सभापती सौं कविता श्रीकांत गावंडे अभिनंदन केले. तालुक्यात शेतकरी बंधुंना आपला शेतमाल विकण्याकरीता जिल्हाच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहीलेली नाही. मोठी बाजार पेठ उपलब्ध करून दिल्यामुळे काल चणाची ९ हजार विक्रमी आवक आली.
तालुक्यात मका उत्पादकाची वाढती संख्या लक्षात घेता तसेच रब्बी हंगामातील पिकाचे शेतकरी बंधुंनी जास्तीत जास्त उत्पादनात वाढ व्हावी या उददेशने तालुक्याचे माजी आमदार विरेन्द्र जगताप यांच्या मार्गदर्शनात धामणगांव बाजारसमितीमध्ये मका खरेदीचा शुभारंभकरण्यात आला.

शनिवारी बाजारसमितीच्या आवारात संचालक मंडळाच्या उपस्थित प्रथमच मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी मनिष ट्रेडर्सचे संचालक मनिष केला यांच्या खेदीमध्ये आडते प्रदिप राठी यांच्या आडत मध्ये हिंगणगांव येथील शेतकरी दिवाकर चौधरी यांच्या मक्का खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी २०११ प्रती किंवटल भाव मिळाला.
सर्वप्रथम समितीचे संचालक डॉ. प्रमोद रोंघे, देवराव बमणोटे, चंदू ठाकरे, राधेशाम चांडक, दिनेश जगताप, गिरीश भुतडा यांनी काटा पुजन करुन शुभारंभीय कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आज विक्री करीता मक्का आनणाऱ्या शेतकरी बंधु दिवाकर चौधरी यांचे डॉ. प्रमोद रोंघे यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शेतकरी प्रशांत वानखडे यांचा संचालक मंगेश बोबडे यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच शेतकरी किशोर लकडे यांचा संचालक मुकुंद माहोरे यांनी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे संचालक डॉ. प्रमोद रोंघे दिनेश जगताप, देवराव बमनोटे, चंदु ठाकरे, रोधश्याम चांडक, गिरीष भुतडा, मुकुंद माहोरे, मंगेश बोबडे, संदीप दावेदार, रवी रतनलाल भुतडा, विपीन ठाकरे, सचिन सोमोसे, विलास भिल, तसेच खरेदी विक्री संघाचे संचालक, सुनील भोगे गणेश धवने, व खरेदीदार मनिष केला, संजय अग्रवाल, निलुभाऊ पनपालिा, प्रदिप कुचेरीया, शौलेश वसानी, राजेश गंगण, सुरेद्र जयस्वाल, नितीन गंगण, प्रदिप राठी, प्रमोद मुधडा, पवन लाहोटी, प्रविण पनपालिया, मुकेश पनपालीया, कमल झवर, कैलास राठी, रतेश ठाकरे, गोवर्धन राठी, तसेच मोठ्या संमधाने शेतकरी बंधु व इतर सर्व अडते, बाजार समितीचे सचिव प्रवीण वानखडे दिनेश गोमासे व कर्मचारी, हमाल बंधु मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!