धामणगाव रेल्वे

शिकार करण्यासाठी ठेवण्यात आलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने गायीचा जबडा छिन्नविछिन्न

गायीचे फुटलेले तोंड पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा ; कारवाईची मागणी

धामणगाव रेल्वे

विरुळ रोंघे गावातील माजी पोस्ट मास्तर राजकुमार खुरपडे यांच्या मालकीची गाय सकाळी ११ वाजता चरण्यासाठी गेली असता दुपारच्या दरम्यान चुकून गावठी बॉम्ब खाल्ल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. गावठी बाँम्ब खाल्ल्यामुळे गाईच्या चेहऱ्याचा व जबड्याचा गंभीर स्फोट झाला. या घटनेत गाईच्या तोंडाला मोठी दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. सदरचे दृश्य पाहता घरातील व्यक्ती तसेच परिसरातील नागरिकांच्या डोळ्यात आपोआपच अश्रूच्या धारा यावेळी निघाल्या होत्या. सदरच्या घटनेनंतर विरूळ रोंघे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गावातील जनावरे चरण्यासाठी गेले असताना अज्ञात व्यक्तीकडून वन्यप्राण्यांचा शिकार करण्यासाठी वडगाव रोडवर तलावाच्या जवळपास ठेवण्यात आलेल्या गावठी बॉम्ब खाद्य समजून गाईने तो खाल्ल्यानंतर मोठा स्फोट झाला. यामध्ये गाईचा जबडा आणि चेहरा गंभीररीत्या जखमी झाला असून गाईचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे गाईसह मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरची बातमी तसेच जखमी गाय गावपरिसरात पोहोचताच पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिकार करण्यासाठी बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
जखमी गाईची अवस्था पाहता गावातील भाजप कार्यकर्ता तथा ग्रा. प. सदस्य मंगेश गुल्हाने यांनी वसा फाउंडेशन, अमरावती यांच्यशी संपर्क करून त्यांना पाचारण करण्यात आले असून सदरच्या जखमी गाईला उपचाराकरिता अमरावती वसा फाउंडेशन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!