अमरावती

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू, स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांवर नातेवाईकांचा गंभीर आरोप

जन्मानंतर बाळांना मृत घोषित मात्र, अंत्यसंस्कारावेळी हालचाल

अमरावती प्रतिनिधी

अमरावतीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी बाळाची हालचाल सुरू होती. बाळाला परत रूग्णालयात आणण्यात आलं. आसीयुमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, बाळाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानंतर रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रूग्णालयात काल एका महिलेची प्रसूती झाली होती. या महिलेनं तीन बाळांना जन्म दिला. मात्र तिन्ही बाळांचा थोड्या वेळानंतर मृत्यू झाला. यानंतर मृत बाळांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं. अंत्यसंस्काराच्या वेळी एका बाळाची हालचाल सुरू असल्याचा भास नातेवाईकांना झाला.
नातेवाईकांनी तातडीने बाळांना घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालयात धाव घेतली. आयसीयुमध्ये बाळांना दाखल केलं. मात्र, बाळांचा मृत्यू झाला. तिन्ही बाळ जिवंत होते. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बाळांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “ही प्रसूती नव्हे, तर २० आठवड्यात झालेलं अबॉर्शन होतं. बाळांचं वजन केवळ ३०० ग्रॅम होतं. तिन्ही बाळं जन्मत:च मृत होती. नातेवाईकांनी परत आणलेलं बाळही तपासल्यानंतर मृत आढळलं”, अशी माहिती त्यांनी दिली.
यापूर्वी देखील महिलेचे वर्षभरापूर्वी वीस आठवड्यातच अबोर्शन झाले असल्याची माहिती देखील विनोद पवार यांनी दिली. याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!