अमरावती

६ तक्रारी व बदली होऊन सुद्धा मारोती थोरवे जाग्यावरच ।

थोरवे यांच्या पाठीमागे कोणाचा वरदहस्त ?

प्रतिनिधी – दिपक म्हस्के

सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील वादग्रस्त अधिकारी असलेले सहाय्यक मुख्यालय मारोती थोरवे यांच्या विरोधामध्ये जिल्हा भूमी अधीक्षक तसेच उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय अमरावती त्याचबरोबर महसूल मंत्री यांच्याकडे जवळपास सहा तक्रारी गेलेल्या आहेत, या तक्रारीची दखल घेत चौकशीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून थोरवे यांची बदली अमरावती जिल्ह्यामध्ये करण्यात आली तसा बदलीचा आदेश दिनांक २४ जून रोजी निघाला ‘ मात्र काही राजकीय मंडळींना हाताशी धरून त्याचबरोबर एस आय आर मतदान याद्या पुर्न: निरीक्षण मध्ये मारोती थोरवे यांचे नाव दिनांक २५ जून रोजी समाविष्ट करण्यात आले, ज्या कर्मचाऱ्यांना सिंदखेडराजा तालुक्यातील समस्त नागरिक कंटाळलेले होते त्यांची दादागिरी तसेच वादग्रस्त मोजण्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता त्याच अधिकाऱ्यांना तालुक्यामध्ये परत राहण्यासाठी एक प्रकारे मदतच करण्यात आली. असे असेल तर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत ते तालुक्यातच राहतील व अनेक कारणामे ते करतील यात काही शंका नाही, त्यामुळे थोरवे यांना तातडीने अमरावतीला पाठवणे गरजेचे आहे ‘ कोणाचा राजकीय वरदहस्त त्यांच्यावर असल्यामुळे आजही ते तालुक्यामध्ये थांबलेले असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची वादग्रस्त प्रकरणे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ‘ शेंदुर्जन येथील व्यक्तीची सुद्धा चुकीची मोजणी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे आहे ‘
त्यामुळे वादग्रस्त अधिकारी पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कशासाठी हा प्रश्न निर्माण होत आहे एका बाजूला तुकाराम मुंडे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी लोकांच्या मनामध्ये हिरो ठरलेले असताना ‘ झिरो अधिकारी मात्र जनतेची लय लूट करताना दिसत आहे त्यामुळे हितसंबंध बाजूला सारून वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणे कितपत योग्य आहे ? थोरवे यांची लवकरात लवकर बदली न झाल्यास पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पॅंथर सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश हिवाळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!