अमरावती

पत्रकाराला धमकी दिल्याची तक्रार; सिंदखेडराजा पोलिसांत एन.सी.आर. दाखल

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मच्याऱ्या विरुद्ध तक्रार दाखल

प्रतिनिधी – दिपक म्हस्के

सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा येथील पत्रकार गजानन बाबुराव कहाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात असंज्ञेय अपराधाची नोंद (एन.सी.आर.) करण्यात आली आहे.
पोलीस नोंदीनुसार, तक्रारदार गजानन कहाळे यांनी दि. ३० जून २०२६ रोजी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, दि. २२ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त तालुका आरोग्य कार्यालय, सिंदखेडराजा येथे गेले असता कार्यालय नियोजित वेळेत बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कार्यालयाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला होता. यानंतर कार्यालयातील कर्मचारी अंबादास लक्ष्मण डुकरे यांनी फोन करून फोटो काढण्याबाबत विचारणा केली व धमकी दिल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित व्यक्तीने वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केल्यास तसेच तहसीलदार व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आणि पत्रकारिता करू देणार नाही, अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असून सुरक्षिततेबाबत भीती वाटत असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३५१(२) नुसार एन.सी.आर. क्रमांक ०२६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!