धामणगाव रेल्वे शैक्षणिक

“राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्काराने ” कलाशिक्षक अजय जिरापुरे सन्मानित..

सातारा येथे ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत मिळाला सन्मान

धामणगाव रेल्वे

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांचे सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात योगदान, ध्येयनिष्ठ, प्रामाणिकपणा, त्यागपूर्ण आणि सकारात्मक असे आणि भावी राष्ट्र निर्माण कार्याला, विद्यार्थ्यांवरील चित्र संस्कार कार्याला अतुलनीय योगदान देत कला शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल तसेच कलेमध्ये दाखवलेली तळमळ आणि कार्यप्रवृत्ती बद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळातर्फे कै. दिनकर हरचंद मोघे, नंदुरबार यांच्या स्मरणार्थ “राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार” – २०२६ ने राज्याध्यक्ष नरेंद्र बाराई, राज्य उपाध्यक्ष बलराम सावंत, राज्य सरचिटणीस दिगांबर बेंडाळे, राज्य कोषाध्यक्ष विजयसिंह ठाकूर, राज्य सहसरचिटणीस प्रकाश पाटील व सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपूर्वक शाल, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले..
महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे व सातारा जिल्हा कलाध्यापक संघ आयोजित ४४ वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद २०२६ चे आयोजन जिल्हा – सातारा येथे दिनांक – २८ व २९ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते.. ४४ वी कला शिक्षण परिषदेत महाराष्ट्र राज्यातील १५ कला शिक्षकांचे फलक रेखाटन प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. यामध्ये कला शिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे हे एकमेव अमरावती जिल्ह्यामधून फलक रेखाटन प्रात्यक्षिक साठी सहभागी असून या फलक रेखाटन प्रात्यक्षिकामध्ये कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी रयतेचे राजे, बहुजनप्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी सर्वप्रथम शोधून काढणारे सत्यशोधक “क्रांतिसूर्य” महात्मा जोतीराव फुले यांचे फलक रेखाटन करून त्यांना त्रिवार मनाचा मुजरा केला व खडूंच्या माध्यमातून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रेषांचे स्ट्रोक मधून व्यक्तिचित्र रेखाटन करून आपल्या चित्र शैलीचा वेगळेपणा दर्शवीला…

अजय जिरापुरे यांनी आपल्या कलेतून सादर केलेलं व्यक्तीचित्र रेखाटन 

या सर्व फलक रेखाटनाचे दोन दिवस कार्यक्रम स्थळी प्रदर्शन भरवण्यात आले होते.. कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी दिलेल्या फलक लेखन या कला प्रकाराचे प्रात्यक्षिक देऊन महाराष्ट्रातील उपस्थित कला शिक्षकांना या नावीन्यपूर्ण माध्यमाविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल या कला शिक्षण परिषदेत कार्यक्रम स्थळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला..
कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना “राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार” मिळाल्याबद्दल व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत फलक रेखाटनाचा ठसा महाराष्ट्र राज्यात उमटविल्या बद्दल धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर व तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!