धामणगाव रेल्वे प्रशासन कार्यवाही

रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर तहसील गौण खनिज पथकाची कारवाई

१६ चाकी ट्रक कारवाई करिता लावला तहसील कार्यालयात

धामणगाव रेल्वे – सुरज वानखडे

विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करताना १६ चाकी ट्रक वर तहसील गौण पथकाने दि. २९ मार्च २०२६ रोजी कारवाई केली आहे. मौजा नारगावंडी येथे समृद्धी महामार्ग पुलाच्या खाली तहसीलदार धामणगाव रेल्वे अभय घोरपडे यांच्या गौन खनिज पथक च्या कारवाई मध्ये गौण खनिज वाहतूक करतांना १६ चाकी ट्रक क्रमांक एम एच ४९ ए टी ९७७७ आढळून आला. सदर ट्रक थांबवला असता ट्रॅक चालक सचिन नांदेकर रा. कवठा ता. देवळी जिल्हा वर्धा यास अवैध रेती वाहतुकीचा परवाना विचारला मात्र त्याच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. सदर ट्रॅक हा फिरोज खान रा. वर्धा यांच्या मालकीचा असून सदर ट्रॅक मध्ये अंदाजे १२ ब्रास रेती अवैधरीत्या उत्खनन करून विनापरवाना सदर रेती हि धामणगाव रेल्वे येथे घेऊन जात असल्याचे ट्रॅक चालक यांनी सांगितले. ट्रॅक व रेतीचा पंचासमक्ष पंचनामा करण्यात आलेला असून दंडात्मक कारवाई करिता ट्रॅक तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आलेला आहे.
सदर गौण खनिज पथकाच्या कारवाई मध्ये तहसीलदार धामणगाव रेल्वे अभय घोरपडे, ग्राम महसूल अधिकारी गोपाल नागरिकर, दिनेश ठाकरे, अनिल धुळे, विनोद जायभाये हजर होते..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!