धक्कादायक धामणगाव रेल्वे

शेतकऱ्याच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला ; ६ एकरामधील तुरीच्या गंज्याची राखरांगोळी

आरोपी विरुद्ध मंगरूळ द. पोलिसात गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी गजानन वाणी यांचे ब. हानपूर शेतशिवारात सर्वे न. १९/१ असे ८ एकर शेत असून यावर्षी त्यांनी ६ एकराच्या माळ्यात तुरीची पेरणी केली होती. त्यामध्ये जवळपास ५५० पेंड्या सोंगून त्या काढण्यासाठी ५ वेगवेगळ्या ठिकाणी तुरीच्या गंज्या लावण्यात आल्या होत्या. मात्र त्या गंज्या काढण्याआधीच ५ ही गंज्याला आग लावीत संपूर्ण पिकाची राखरांगोळी केल्याची धक्कादायक घटना दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली आहे. त्यामध्ये शेतकरी यांचे ३ ते ४ लाख रुयांचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. तर तक्रारदार ऋषभ गजानन वाणी दिलेल्या तक्रारींवर आरोपी आशिष जगताप रा. वसाड ता. धामणगाव रेल्वे यांच्यावर बी. एन. एस कलम ३२६एफ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी असून शेतकऱ्याच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. एकीकडे निसर्गाची साथ नसताना कसे बसे पीक जोपासले होते. त्या पिकांमधुन घेतलेले कर्ज फेडू अशी आस वाणी कुटुंबाला असताना शेतातील ५ ही तुरीच्या गंज्याची राखरांगोळी झालेली पाहताना जणू पायाखालची वाळूच सरकल्याचे ऋषभ वाणी म्हटले आहे. सकाळी शेतात जाऊन नुकसान झालेले दृश्य पाहिले असता ऋषभ वाणी यांनी ११२ वर लगेच कॉल असता मं. दस्तगीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तर सदर घटनेची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला तात्काळ आरोपीवर कारवाई करीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.
 आरोपी आशिष जगताप यांच्या विरोधात मंगरूळ दस्तगीर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासन करीत आहे तर वृत्त लिहिस्तोवर अद्याप आरोपी अटक नसल्याची माहिती मंगरूळ द. ठाणेदार गौतम इंगळे यांनी दिली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!