धामणगाव रेल्वे सामाजिक

सुवर्णकार व्यापारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

प्रवीण सोनी, मनोज भगत, आशिष तिनखेडे, किशोर सोनी यांची पदाला वर्णी

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील सुवर्णकार व्यापारी संघटनेची दि. २९ जानेवारी रोजीच्या आयोजित सभेमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण सोनी, उपाध्यक्षपदी मनोज भगत, सचिवपदी आशिष तिनखेडे तर कोषाध्यक्षपदी किशोर सोनी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी अध्यक्ष प्रमोद भगत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण सोनी तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकारणी सभेत सुवर्णकार व्यापारांकडून दर शनिवारी व राष्ट्रीय उत्सव १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी प्रतिष्टान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.सदरच्या सभेत व्यापारी सुवर्णकार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सध्यस्थित सोने व चांदीच्या वाढत्या दरांमुळे व्यापारी व कारागिरांच्या मनात समस्याची वाढ निर्माण होत आहे. तर दिवसभरात सोने चांदीच्या भावात बराच चढ़ उतार होत असल्याने ग्राहकांमधे सुद्धा मोठा संभ्रम निर्माण होत आहे. परंतु सदरच्या भावात चढ उतार हे व्यापारी वर्गाच्या हाती नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून सुवर्णकार व्यापारी संघटनेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करीत समाजहितार्थ कामे करण्यात आले आहे. तर भविष्यात अधिक अभ्यासूपणे लक्ष देण्यासंदर्भात तसेच पूर्वीचे उपक्रम जोमाने राबविण्यासंदर्भात सर्वसहमतीने निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण सोनी यांनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!