अमरावती

राकेश गाठे याना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागाची ऐतिहासिक संधी

गरीबीवर मात करत समाजसेवेचे गाठले शिखर

वरूड तालुका प्रतिनिधी – निलेश निंबाळकर

तालुक्यातील एका छोट्याशा वावरुळी गावातून आलेले, गरीब कुटुंबात जन्मलेले समाजसेवक राकेश गाठे यांनी आपल्या निस्वार्थ सेवेमुळे संपूर्ण तालुक्याचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाल्याने सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राकेश गाठे यांनी मनोरुग्ण, भिक्षेकरी, वृद्ध, निराधार, अपंग, बेघर, अनाथ व्यक्तींच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ते देवदूत ठरले आहेत.
मनोरुग्णांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करणे, वृद्धांना वृद्धाश्रमात आधार देणे, बेघरांना रोजगार मिळवून देणे, तुटलेल्या कुटुंबांचे पुन्हा मिलन घडवून आणणे, व्यसनमुक्ती, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर वैद्यकीय उपचार करून देणे — असा सेवेचा अखंड प्रवास त्यांनी आजवर केला आहे. “मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या,” हे त्यांचे वाक्य त्यांच्या कार्याची खरी ओळख सांगते. ते म्हणतात, “माझ्याकडे पैसा नाही, पण माझ्या केलेल्या चांगल्या कर्मांचा, कामाचा डोंगर माझ्याकडे आहे.” कोणताही स्वार्थ न ठेवता, प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी केलेल्या या मानवतेच्या सेवेला आज देशपातळीवर मान्यता मिळत आहे. दिल्लीच्या राजपथावर त्यांच्या पावलांनी केवळ त्यांचेच नव्हे, तर वावरुळी गावाचे, वरूड तालुक्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. राकेश गाठे यांना मिळालेली ही संधी म्हणजे सेवेची पावती असून, अनेक तरुणांसाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून खूप खूप अभिनंदन आणि पुढील समाजसेवेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!