अमरावती

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारली जाणारी फी नगर पंचायतचे शासकीय खात्यात जमा करा – प्रांजली गुल्हाने, नगरसेविका

नांदगाव खंडेश्वर – प्रतिनिधी

नगर पंचायत क्षेत्रात जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारली जाणारी फी शासकीय तिजोरीत जमा करण्याबाबतची प्रक्रिया आणि नियम आहेत. विहित शुल्क संरचना जन्म-मृत्यूची नोंदणी २१ दिवसांच्या आत केल्यास ती मोफत असते मात्र, त्यानंतरच्या विलंबासाठी १ ते १० रुपयांपर्यंत विलंब शुल्क आकारले जाते. दाखल्याच्या प्रतिसाठी साधारणपणे नगर पंचायतला शुल्क द्यावे लागते, नियमानुसार फी जमा करण्याची पद्धत नगर पंचायत स्तरावर जमा होणारी ही फी महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता नियम, २०११ नुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकृत खात्यात जमा केली जाते. मात्र नगर पंचायत कार्यालयामार्फत नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले वितरित केले जातात.
जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ नुसार, विहित मुदतीनंतरच्या नोंदणीसाठी किंवा अतिरिक्त प्रतींसाठी ठराविक शुल्क आकारले जाते.सध्या नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कार्यालयात सदर फी संकलनाची प्रक्रिया ‘रोख स्वरूपात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पारदर्शकता जपण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही सर्व फी रक्कम थेट शासकीय महसूल खात्यात किंवा नगर पंचायतीच्या अधिकृत बैंक खात्यात जमा करण्यात यावी. तसेच नागरिकांना यासाठी ‘क्युआर कोड’ किंवा ‘ऑनलाइन पेमेंट’ ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या डिजिटल इंडिया मोहिमेला बळकटी मिळेल.
जन्म-मृत्यू दाखल्याची फी स्वीकारताना संगणकीय /अधिकृत पावतीच देण्यात यावी.जमा झालेली सर्व रक्कम दररोज शासकीय चलनाद्वारे जमा केली जावी.फीचे दर फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. अशी मागणी सौ. प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका प्रभाग क्रमांक-१४ नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांनी एका लेखी अर्जाव्दारे मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्या कडे केली असुन अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!