राष्ट्रीय विद्यार्थी दिवस तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व तिवसा नगर ची नूतन नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली. यादवराव देशमुख कला व विज्ञान महाविद्यालय तिवसा येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने अमरावती विभाग संयोजक वृषभ गोहणे, अमरावती जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे, अमरावती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, महाविद्यालयातील एन. एस. एस. प्रमुख प्राध्यापक सोळंके आणि नूतन नगर मंत्री खुशी कडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे यांनी तिवसा नगराची नूतन नगर कार्यकारणीची घोषणा केली यावेळेस नगर मंत्री म्हणून खुषी कडे, नगर सहमंत्री ज्ञानेश्वरी गाते, सहमंत्री आकाश घोलप, राष्ट्रीय कला मंच प्रमुख तनुश्री आतकरी, विशाल गायकवाड, एस. एफ. डी. संयोजक शुभम गोळवे, एस. एफ. एस. संयोजक सक्षम अतकरी, सोशल मीडिया संयोजक चेतन गाते, सदस्य सुमित कोल्हे व इतर कार्यकर्त्यांची घोषणा करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोठ्या प्रमाणात “व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण” यावर विश्वास ठेवून कार्य करत असते. त्यात अनेक सामाजिक उपक्रम कार्यक्रम विद्यार्थी परिषदे द्वारे चालवले जातात. ९ जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिवस च्या निमित्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार हा कार्यक्रम राबवत असते. समाजातील असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेला, त्यांच्या मेहनतीला कुठेतरी प्रोत्साहन प्राप्त व्हावं आणि त्यांच्या या यशाला कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राबवित असते. या वर्षी देखील हा सोहळा 4 जुलै ला तिवसा येथे राबवण्यात आला, डॉ. हेमंत देशमुख यांच्या हस्ते तिवसा नगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच डॉ. हेमंत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मंच प्राप्त होऊन राष्ट्र पुनर्निर्माणात त्यांचे योगदान वाढावे, या उद्देशाने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन अ. भा. वि. प. तर्फे करण्यात येत असते .
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व तिवसा नगरातील नागरिक उपस्थित होते.
Add Comment