सामाजिक

पाणी पुरवठा सभापती विलास बुटले राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्काराने सन्मानित

धामणगाव रेल्वे

नागपूर येथे केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली तर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या २०२६ वार्षिक मिटिंगमध्ये ३१ जानेवारी रोजी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलीद दहीवले यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील रविभवन येथे आयोजित समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सातत्याने समाजातील विविध क्षेत्रात कार्यतत्परतेने आपली भूमिका बजावत असेलेले धामणगाव रेल्वे येथील रहिवासी विलास सुभाषराव बुटले भारतीय जनता पक्षाचे व्यापारी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तसेच धामणगाव नगरपरिषदचे नगरसेवक पाणी पुरवठा सभापती यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलीद दहीवले यांच्या हस्ते विलास बुटले यांना राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!