धामणगाव रेल्वे

माजी ग्रा. प. सदस्य नितीन मेंढुले यांनी केलेले आरोप पूर्णतः बिनबुडाचे आणि खोटे – शुभम तरोणे, उपसरपंच कासारखेडा हि.

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

येथील कासारखेडा ग्रामपंचायतमधील माजी ग्रा. प. सदस्य नितीन मेंढुले यांनी उपसरपंच शुभम तरोने व सरपंच सौ. निलिमा पांडे यांच्यावर केलेले आरोप हे पूर्णतः बिनबुडाचे, खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे मत शुभम तरोणे यांनी व्यक्त केले आहे.
सदर प्रकरणात तत्कालीन ग्रामपंचायत सचिव सचिन तसर यांच्याविरुद्ध पंचायत समिती धामणगाव रेल्वे मार्फत शिस्तभंग कारवाई प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून, त्यामध्ये शासन निर्णय व नियमांचे उल्लंघन, चुकीचे मार्गदर्शन, तसेच दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजीची ग्रामपंचायत सभा अर्धवट सोडल्याबाबत गंभीर बाबी नमूद आहेत. सदर कृत्य हे महाराष्ट्र जिल्हा परिषद (शिस्त व अपील) नियम १९६४ अंतर्गत गैरवर्तन म्हणून ग्राह्य धरले गेले आहे.
मात्र, या सर्व अधिकृत नोंदी असूनही माजी ग्रा. प. सदस्य नितीन मेंढुले यांनी संबंधित सचिवांना जाणीवपूर्वक वगळून इतरांवर आरोप करणे हे संशयास्पद असून, हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होते. आम्हाला अपात्र करण्याचा डाव आधीपासूनच आखण्यात आला असताना तो २०२१ मध्येच निष्फळ ठरला तसेच, २०२१ मधील प्रकरणात त्यावेळी कोणत्याही तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले नव्हती. त्यामुळे २०२४ मध्ये हेच प्रकरण पुन्हा पुढे आणणे हा जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे शुभम तरोणे यावेळी म्हटले आहे.

सेवा सहकारी संस्थेची तक्रार करताच माजी ग्रा. प. सदस्याने पुन्हा उकरले प्रकरण ?

कासारखेडा येथील सेवा सहकारी संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता आढळून येत असल्याने संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा व पूर्व अध्यक्ष नितीन मेंढुले यांच्या विरोधात सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, धामणगाव रेल्वे यांच्याकडे संस्थेच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तक्रार करताच माजी सरपंच यांनी पुन्हा त्रास देण्याच्या उद्देश्याने ग्रा. प. चे प्रकरण उकरून काढल्याचे बोलल्या जात आहे. जेव्हा कि, यामध्ये दोषी सचिव सचिन तसर असताना त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख नितीन मेंढुले यांच्याकडून करण्यात आला नसल्याचे यावेळी शुभम तरोणे यांनी म्हटले आहे.
जेव्हा कि, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७५, ७८, ८१ व ८३ चे उल्लंघन करताना अनेक वर्षांपासून वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) न घेणे, नियमित लेखापरीक्षण (Audit) न करणे, आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव, संचालक मंडळाकडून कर्तव्यच्युती या सर्व बाबी गंभीर स्वरूपाच्या असून, संबंधितांवर चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपले पितळ उघडे पडणार यामुळे ओक्सबोक्शी होऊन माजी सरपंच नितीन मेंढुले हे आमच्यावर पूर्णतः बिनबुडाचे आणि खोटे आरोप करीत असल्याचे शुभम तरोणे यांचे म्हणणे आहे.
इत्तर नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये यासाठी आयुक्तांनी दिनांक ०४ डिसेंबर २०२५ व ०१ एप्रिल २०२६ रोजी दिलेले आदेश/निर्णय सार्वजनिक करावेत, जेणेकरून संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल व कुठलीही दिशाभूल होणार नसल्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.

आमच्यावर करण्यात येणारे सर्व आरोप, धमक्या व दबाव तंत्र आम्ही पूर्णतः फेटाळून लावतो. आवश्यक असल्यास, आम्ही याबाबत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क राखून ठेवतो – शुभम दिलीपराव तरोने (उपसरपंच)

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!