धामणगाव रेल्वे

कासारखेडा प्रकरणात उपसरपंच शुभम तरोणे यांचा मोठा खुलासा

नितीन मेंढुले यांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारी फक्त मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने – शुभम तरोणे

धामणगाव रेल्वे

ग्राम पंचायत कासारखेडा प्रकरणात तक्रारदार नितीन मेंदुले यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा गंभीर आरोप उपसरपंच शुभम दिलीपराव तरोने यांनी केला आहे. सरपंच व उपसरपंच यांच्यावर ६ वर्ष अपात्रता व FIR ची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली असताना अप्पर आयुक्त व ग्रामविकास मंत्री यांच्या आदेशात कुठेच नमूद नसल्याचे म्हटल्या गेले आहे. तर उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ मध्ये प्रकरण प्रलंबित असताना तसेच ग्रामविकास मंत्री स्तरावर अपील निर्णय प्रक्रियेत असताना नितीन मेंढुले यांनी जाणीवपूर्वक खोटे मुद्दे तयार करून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करणे म्हणजे आदेशाचा अवमान, प्रशासनाची दिशाभूल, आणि न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा जोरदार पलटवार शुभम तरोणे यांनी केला आहे.
दरम्यान इतरांना खोटी माहिती देणे, प्रशासनाला चुकीच्या मार्गावर नेणे, कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, न्यायालयीन प्रकरणावर परिणाम करण्याचा प्रयत्न नितीन मेंढुले करीत आदेशात नसलेल्या गोष्टी मुद्दाम घालून बदनामी केली जात असून हा सरळ राजकीय कट असल्याने त्यावर कायदेशीर मार्गाने लढा देणार असून खोट्या तक्रारी करून बदनामी केल्यास कठोर कायदेशीर कारवाई व मानहानी दावा दाखल करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

माझ्यावर केलेले आरोप हे तथ्यहीन असून, राजकीय दबावतंत्राचा वापर करून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न तक्रारदार नितीन मेंढुले करीत आहे. त्यामुळे माजी जाणीवपूर्वक समाजात बदनामी करण्याचा डाव तक्रारदाराकडून होत आहे. त्यावर कायदेशीर लढा मी देणार आहेशुभम दिलीपराव तरोने, उपसरपंच तथा प्रशासकीय सदस्य, ग्राम पंचायत कासारखेडा

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!