धामणगाव रेल्वे

रामगावात रक्तदान करून महामानवाला अभिवादन

अल्पेश बन्सोड व सहकार्यांचा समाजपयोगी उपक्रम

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील रामगाव या छोट्याश्या गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत समाजाप्रती असलेली जाणीव, सामाजिक बांधिलकी, माणुसकी, सेवाभाव उराशी बाळगून, २३ रक्तदात्यानी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केले आहे. दि. १२ एप्रिल रोजी रामगाव येथील बुद्ध विहारात रक्तदान शिबिराचे आयोजन अल्पेश बन्सोड सह त्यांचे सहकारी मित्रांनी पुढाकार घेत हा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

समाजात वावरताना आपल्यावर समाजाचे अनेक उपकार असताना त्याची परतफेड म्हणून फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून देण्याचा प्रयत्न याठिकाणी या तरुणांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्वस्वी कौतुक होत आहे. यावेळी एकनिल ब्लड सेंटर यवतमाळ यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली असता रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता अल्पेश बन्सोड, आदित्य बन्सोड,पं कज काळबांडे, संकेत डबले, भूषण तुपसुंदरे, मगेश मडामे, वेदांत पाटील, सार्थक भोयर, अंशू भोयर, राहुल बन्सोड, मोहित निकोसे, आर्यन भोयर, अनुकूल सोनटक्के, प्रज्वल मडामे, यांनी अधिक मेहनत घेतली …
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!