धामणगाव रेल्वे

दिघी महल्ले घाटात महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई

रेती तस्करांनी पोकलेन आणि ट्रक घेऊन केले पलायन

धामणगाव रेल्वे

येथील निवासी नायब तहसीलदार रितुराज पटोरकर, ग्राम महसूल अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाने दिघी महल्ले घाटात आकस्मित धाड टाकल्याने काही काळ रेती तस्करांची मोठी तारांबळ उडाली असून घाटातून काढलेला २० ब्रास रेतीसाठी जागेवरच सोडून पोकलेन व ट्रक घेऊन रेती तस्करांनी पलायन केल्याचे उघडकीस आले आहे.
दि. १३ एप्रिल २६ रोजी दुपारी ३ वाजता तहसीलदार अभय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी यांनी मौजा दिघी महल्ले येथील रेती घाटाला अचानक पने भेट दिली असताना गट नं. ४ मध्ये अवैध रेती उत्खनन होत असल्याचे दिसून आले. उत्खनन करणारे हे वर्धा जिल्ह्याचे असून ते रेती उत्खनन करीत असलेल्या ठिकाणावरून पोकलेन व ट्रक घेऊन पळून गेले. परंतु उत्खनन करीत असलेल्या ठिकाणी एक लोखंडी बोट सक्शन पंपासहित तसेच रिकामे ड्रम व इतर साहित्य मिळून आले. सदर उत्खनन होत असलेल्या ठिकाणी चारही बाजूने खोल पाणी असल्यामुळे व रस्ता नसल्यामुळे मिळून आलेले साहित्य जप्त करून घेऊन जाने शक्य नसल्यामुळे ते जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच उत्खनन होत असलेल्या ठिकाणी अंदाजे २० ब्रास असलेला रेती साठा जागेवरच पसरून देऊन त्यात माती मिक्स करण्यात आली. व वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतील वाहतुकी साठी तयार केलेला रस्ता सुद्धा नष्ट करण्यात आला.

घाटात जागेवरच नष्ट करण्यात आलेले उपकरण 

सदरील संपूर्ण कारवाई महसूल विभाग व पोलीस विभाग मिळून संयुक्तरित्या करण्यात आली. सदर कारवाई मध्ये रितुराज पटोरकर निवासी नायब तहसीलदार धा. रेल्वे. ग्राम महसूल अधिकारी आकाश चव्हाण, सागर भांडवले, परेश धर्माळे, महसूल सेवक आकाश खडसे व पोलीस विभागातील एएसआय जयंत परतेती, हेड कॉन्स्टेबल सहदेव राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश ठवकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!