सरपंचाने केलेला कथित घोटाळा उघडकीस येणार ?
धामणगाव रेल्वे
रोजगार सेवकाच्या नियुक्ती प्रकरणापासून ग्रा. प. जळका ( पटाचे ) चर्चेचा विषय बनली आहे. त्यातही आमसभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर काही नागरिकांवर गुन्हे दाखल झाल्याने गावातील वातावरण तापले असताना सरपंचाच्या मनमानी विरोधात नागरिकांनी एकजूट दाखवून सरपंचाने ५ वर्षे विकासाच्या नावावर चालवलेल्या कथित घोटाळ्याचे जणू खोदकामाचं सुरु केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यापूर्वी १२ फेब्रुवारी रोजी जळका ( पटाचे ) गावातील समस्त नागरिकांनी आमच्या गावच्या सरपंचाने एक ना अनेक कामात अनियमितता दाखवित जवळपास ४० ते ५० लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत पुराव्यासहित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित ग्रा. प. मधील २०२२ ते २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असून विनाविलंब चौकशी पूर्ण करून संपूर्ण अहवाल कार्यालयास पाठविण्यात सांगितले आहे. त्यामुळे लवकरच जळका ( पटाचे ) ग्रा. प. मधील संपूर्ण कामाची चौकशी होऊन सत्यता जनतेसमोर येणार आहे.














Add Comment