धामणगाव रेल्वे शासकीय

पिंपळखुटा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रम

पाणी उपलब्धता आराखडा व आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

धामणगाव रेल्वे

दि. २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पिंपळखुटा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर सह पाणी उपलब्धता आराखडा (पाण्याचा ताळेबंद) चा उपक्रम घेण्यात आला. पाणी उपलब्धता आराखडा (पाण्याचा ताळेबंद) या पोस्टर चे गटविकास अधिकारी प्रफुल भोरखडे धा. रेल्वे यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले, यावेळी विस्तार अधिकारी निलेश वाघ, ग्रामविकास अधिकारी कु. पल्लवी रंगारी, सरपंच दिलीप राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य आशा रुद्रकर, कुसुम टांगले, पोलीस पाटील सौ. गायके ताई, अंगणवाडी मदतनीस हे प्रामुख्याने उपस्थित होते.

नागरिक आरोग्याची तपासणी करताना 

तसेच आरोग्य शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने ३७ लोकांची तपासणी करण्यात आली. रुग्णांना रक्तदाब, मधुमेह (साखर), हिमोग्लोबिन, वजन तपासणी व मेडिसिन चा वाटप करण्यात आला. या शिबिरामध्ये गोडे हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्र अंजनसिंगी येथील डॉक्टर व परिचारिका यांच्याकडून नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच सर्वसाधारण आजारांचे निदान करण्यात आले.

नागरिकांना देण्यात आलेल्या पाण्याच्या कॅन

त्यानंतर सन २०२५ – २६ मधील १५% व ५% खर्च अंतर्गत मागासवर्गीय व दिव्यांग नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा कॅन (२० लिटर) वाटप करण्यात आला या सर्व उपक्रमांमध्ये गावातील नागरिकांचा, युवकांचा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षिका त्याचबरोबर विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!