धामणगाव रेल्वे

विवादित ग्रा. प. जळका पटाचे रोजगार सेवक प्रकरण संपता संपेना !

निवडणुकीत विजयी रोजगार सेवकाची घोषणा झाली मात्र, सेवकाला अद्यापही नियुक्ती पत्र नाहीच

धामणगाव रेल्वे 

         ज्या रोजगार सेवक पदामुळे अख्या जळका पटाच्या ग्रा. प. ची चौकशी लागली ते प्रकरण अद्यापही संपायचे नाव घेताना दिसत नाही. २ विवादित ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात निवडणुकीच्या माध्यमातून ९ मार्च रोजी उमेदवार अंकिता उमेश इंगळे यांची १७६ वोट मिळवून नवनियुक्त रोजगार सेवक पदाची घोषणा झालेली असताना आजपर्यंत सुद्धा अंकिता इंगळे यांना रोजगार सेवक पदाची नियुक्ती पत्र मिळाले नाही. त्यामुळे अंकिता इंगळे यांनी गटविकास अधिकाऱ्याकडे न्यायाची मागणी केली असल्याने पुन्हा हे विवादित प्रकरण चव्हाट्यावर आले आहे…

सरपंचाने नियुक्ती पत्रावर सही न केल्याने प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर

अंकिता इंगळे यांच्या तक्रारीनुसार दि. ९ मार्च रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत तळेगावचे दशासर चे ठाणेदार सह १० पोलीस कर्मचारी, ४ पंचायत समिती अधिकारी, गावाचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत कायदेशीर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यामध्ये मला १७६ वोट मिळाल्याने माझ्या नावाची रोजगार सेवक पदासाठी घोषणा करण्यात आली. मात्र अजूनही ग्रा. प. ने अधिकृत ठराव घेतला नाही. ग्रा. प. मध्ये अर्ज केला असता सरपंच यांनी सही न केल्यामुळे पुढील कार्यवाहीमध्ये अडथडा निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

ठाणेदार साहेबांसह १० पोलीस कर्मचारी, ४ पंचायत समिती अधिकारी यांच्या उपस्थित पारदर्शी पद्धतीने कायदेशीर निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यात माझा विजय झाला, आणि सरपंच यांच्या भावाचा पराभव झाल्याने जाणीवपूर्वक सरपंच रोजगार सेवकाच्या नियुक्तीचे पत्र काढण्यासाठी अडथळे निर्माण करीत आहे – अंकिता उमेश इंगळे, रोजगार सेवक विजयी उमेदवार

मी ठरावावर सही केलेली आहे. मात्र संगम अशोक राऊत यांना झालेल्या निवणुकीबाबत आक्षेप असल्यामुळे त्यांनी शासन दरबारी तक्रारी केल्या आहे, सध्यस्थित प्रकरण गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांच्या निर्णयानंतर ग्रा. प. निर्णय देईल – पराग राऊत, सरपंच ग्रा. प. जळका ( पटाचे )

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!