धामणगाव रेल्वे शैक्षणिक

कला शिक्षक अजय जिरापुरे ” राष्ट्रस्तरीय भारत भूषण पुरस्कार ” ने सन्मानित

धामणगावातील से.फ.ला हायस्कुल येथे सध्यस्थित कार्यरत

धामणगाव रेल्वे 

नवी मुंबई, कामोठे येथील कलासाधना सामाजिक संस्था, तर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित राष्ट्रस्तरीय सिंधुताई सपकाळ नारी शक्ती गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, व भारत भूषण पुरस्कार जाहीर झालेले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १५ मार्च २०२६ रोजी सरोवर आनेक्स बँकुट हॉल, सेक्टर ६, कामोठे, नवी मुंबई येथे मोठया उत्साहात पार पडला..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन पाटील (महापौर / पनवेल महानगर पालिका) तर प्रमुख पाहुणे विमल बिडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोठे, नवी मुंबई, संध्या म्हात्रे (ज्येष्ठ सिने अभिनेत्री) भास्कर मयेकर (ज्येष्ठ सिने अभिनेता) हेमलता गोवारी नगरसेविका पनवेल महानगरपालिका व तसेच कलासाधना सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मेघा महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ७१५ अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली..

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, धामणगाव रेल्वेचे कला शिक्षक अजय जिरापुरे यांची संपूर्ण विदर्भातुन एकमेव “कला व शैक्षणिक कार्य ” या विभागामधून निवड करण्यात आली कला शिक्षक अजय जिरापुरे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान, ध्येयनिष्ठ, प्रामाणिकपणा, त्यागपूर्ण आणि सकारात्मक असे आणि भावी राष्ट्र निर्माण कार्याला, विद्यार्थ्यांवरील चित्र संस्कार कार्याला अतुलनीय योगदान देत कला शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल तसेच कलेमध्ये दाखवलेली तळमळ आणि कार्यप्रवृत्ती बद्दल त्यांना “राष्ट्रस्तरीय भारत भूषण पुरस्कार ” – २०२६ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वरील उपस्थित या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व मेडल व पुस्तक देवून पुरस्कृत करण्यात आले..

महिला दिन निमित्त स्त्री कर्तृत्वाला सलाम व अभिनंदन करण्यासाठी संध्या म्हात्रे (ज्येष्ठ सिने अभिनेत्री ) यांचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी त्यांच्या विशिष्ट पेनवर्क शैलीत यांचे व्यक्तिचित्र रेखाटन केले.. व त्यांना कार्यक्रमाच्या वेळी सस्नेह भेट दिले.. संध्या म्हात्रे यांनी त्यांचे चित्र रेखाटन केल्याबद्दल कलाशिक्षक अजय जिरापुरे यांच्या पेनवर्क चित्र शैलीचे कौतुक केले व आभार मानले..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!