धामणगाव रेल्वे प्रशासन कार्यवाही

ग्रा. प. जळका पटाच्या चौकशीला प्रारंभ ; सरपंचाने केलेले कथित भ्रष्टाचार प्रकरण ?

धामणगाव रेल्वे

जळका पटाच्या गावातील नागरिकांनी ग्रा. प मध्ये सरपंचाने जवळपास ४० ते ५० लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून अहवाल देण्यात सांगितले होते. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी दोन सदस्य समिती स्थापित करून चौकशी करण्यासंदर्भात पत्र काढले होते. त्यामध्ये विस्तार अधिकारी निलेश वाघ आणि गोपाल वानखडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ६ मार्च ला होणाऱ्या चौकशी मध्ये अधिकाऱ्यांनी फक्त उपस्थिती दाखवून ग्रा. प. मध्ये तक्रारकर्त्याच्या एकूण मुद्द्यांचे स्वरूप जाणून घेतले, त्यामध्ये तक्रारकर्त्यानी २६ मुद्दे मांडले. त्यानंतर आज दि. १७ मार्च २०२६ रोजीपासून त्या संपूर्ण मुद्द्याची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान चौकशी ही विस्तृत स्वरूपाची असल्याने त्याला किमान २ ते ३ दिवस लागणार असल्याची माहिती प्राप्त आहे तर विस्तार अधिकारी गोपाल वानखडे यांनी तातडीने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून प्राथमिक अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगितलं.

चौकशी करताना विस्तार अधिकारी सह सरपंच तथा तक्रारदार उपस्थित 

सरपंच हा हुकूमशाह पद्धतीने वागतो – निशांत कुराडकर, नागरिक जळका ( पटाचे )

सरपंचाने गावात विकास कामे दाखवून अनेक बिले काढली मात्र ते कामाचं गावात झालेले नाही, तसेच तक्रार केल्यानंतर सरपंच हा कमला लागला आहे. मात्र काम सुरु होण्यापूर्वीच कामाचे बिल ही पूर्णतः निघून तयार आहे, आज ही चौकशी सुरु असताना सरपंचाने गावातील इतर नागरिकांना ग्रा. प. बाहेर हाकलून दिले आणि फक्त दोनच तक्रारकर्त्यांना आतमध्ये घेतले आहे. जेव्हा कि, ही तक्रार वैयक्तिक नसून संपूर्ण गावकऱ्यांची आहे. त्यामुळे सरपंच आजही प्रशासक असताना हुकूमशाही पद्धतीने वागत आहे.
तर दुसरीकडे सरपंचाने सगळे आरोप फेटाळून लावत आधीच्या लोकांकडून एवढे कामे झाले नाही त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना भ्रमनिरास झाला असल्याने राजकीय द्वेषापायी माझ्यावर आरोप करण्यात येत असल्याचे मत सरपंच पराग राऊत यांनी मांडले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!