अपघात धामणगाव रेल्वे

कार आणि दुचाकी चा भीषण अपघात ; महिलेचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी

सरूळ ते देवगाव दरम्यान घडली अपघाताची घटना

धामणगाव रेल्वे 

दि. २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी ११ ; ३० च्या दरम्यान सरूळ ते देवगाव रोडवर कार आणि दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ५ व्यक्ती याना गंभीर दुखापत असल्याची माहिती प्राप्त आहे. कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत भावना प्रवीण कदम या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पार्थ देशमुख, प्रवीण देशमुख ,सारिका देशमुख, सीमा वानखडे सह दुचाकीस्वार निलेश बाहे गंभीर जखमी झाल्याने या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी आणि चारचाकी वाहन क्र. एम एच ४६ बी के १५२१ यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी माणुसकी धर्म जोपासत तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी यवतमाळ आणि अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त आहे. तर कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे सदरचा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे या प्रकरण तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

विजय चिंचमलातपुरे जखमी लोकांसाठी बनले देवदूत

सरूळ ते देवगाव दरम्यान घडलेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा असलेली दिसली असताना आपल्या कुटुंबासह लग्न कार्यप्रसंगी जात असलेल्या विजय चिंचमलातपुरे यांनी मानवतेचा परिचय देत जखमींना आपल्या वाहनातून धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेत प्राथमिक उपचार मिळाले असून पुढील उपचाराकरिता जिल्हास्तरीय रुग्णालयात पाठविण्यात आले. विजय चिंचमलातपुरे यांनी आपल्या कुटुंबापेक्षा मदतग्रस्त जखमींना मदत करून माणुसकीचा परिचय दिल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केल्या जात आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!