आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

गंगाजळी गावातील अस्वच्छतेबाबत आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर

गंगाजळी गावाला दिली आरोग्य विभागाने भेट

धामणगाव रेल्वे

गंगाजळी गावातील अस्वच्छतेबाबत चा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित होताच आरोग्य विभागाने तत्परता दाखवत दुसऱ्याच दिवशी गावाला भेट देऊन संपूर्ण गावाची मोक्का पाहणी केली असून ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने स्वच्छता करण्याबाबतचे पत्र दिले आहे. दरम्यान संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या पाण्याच्या टाकीचा परिसर अतिशय झाडा झुडपाने ग्रासला असून मोठ्या प्रमाणात तेथील परिसर दुर्गंधीयुक्त असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाला होता. सदर प्रकरणाची तालुक्यातील आरोग्य विभागाचे टीएचओ डॉ. सुदेवाद यांनी तातडीने दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच ग्रा. प. प्रश्नाला तातडीने गंगाजळी आणि रामगाव गावातील पाण्याच्या टाकीचा परिसर, शेण खताचे ढिगारे, तसेच पाईपलाईन लिकेज दुरुस्ती करण्याबाबत पत्र दिलेले आहे.

आरोग्य सहाय्यक सह तालुका समूह संघटकाची गावाला भेट

गंगाजळी गावातील अस्वच्छतेबाबत व्हिडीओ प्रसारित होताच आरोग्य विभागाचे टीएचओ डॉ. सुदेवाद यांच्या मार्गदर्शनात तालुका आरोग्य सहाय्यक बी. एम. जयस्वाल, तालुका समूह संघटक प्रमोद पोहेकर यांनी गावाला भेट दिली. त्यांना सुद्धा जैसे थेच परिस्थिती आढळून आली असून गावामध्येच शेणखताचे मोठमोठाले ढिगारे, नाल्या बुजलेल्या, तर पाण्याच्या टाकीचा परिसर अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला. त्यामुळे साथरोग व कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली. गावातील जलसुचर कर्मचारी याना फोन केला असता त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रा. प. प्रशासनाला पत्रव्यवहार केला असून त्याची प्रतिलिपी गटविकास अधिकारी याना दिली असल्याचे मत सुद्धा कर्मचाऱ्याकडून देण्यात आले.

गंगाजळी गावातील पाण्याच्या टाकीचा परिसर 

आरोग्य विभागाने आपले कर्तव्य पार पडले असून ग्राम पंचायत प्रशासन आपली जबाबदारी किती तत्परतेने पार पडणार कि, गावात साथरोग आल्यावर त्यांना जाग येणार हे पाहणे देखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!