आधुनिक सुविधा, शेतकरी मार्गदर्शन आणि कोब्रा कमांडोचा हृदयस्पर्शी सत्कार
धामणगाव रेल्वे
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मार्गदर्शन मेळावा सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले.
अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण, सुसज्ज भोजनकक्ष, स्वच्छतागृह तसेच नवीन लिलाव गृहाचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचा संकल्प व्यक्त केला. खासदार वानखडे यांनी बाजार समितीच्या पारदर्शक व शेतकरी हिताच्या कार्याचे कौतुक केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित मार्गदर्शन सत्रात अमरावती येथील प्रख्यात कृषी तज्ज्ञ सुधीर जगताप यांनी ‘तूर पीक व्यवस्थापन’ या विषयावर खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन व कीड नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर मोलाचे मार्गदर्शन केले.















Add Comment