आरोग्य विषयक धामणगाव रेल्वे

आरोग्य विभागाच्या पत्रानंतर ग्रा. प. प्रशासन लागले कामाला

गंगाजळीतील पाण्याच्या टाकीचा परिसर झाला स्वच्छ 

धामणगाव रेल्वे 

गंगाजळी येथील संपूर्ण गावाला पाण्याचा पुरवठा होणाऱ्या टाकीचा परिसर अस्वच्छ असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित होताच आरोग्य विभागाचे टीएचओ डॉ. सुदेवाद यांनी त्या व्हिडिओची तात्काळ दखल घेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून ग्रा. प. प्रशासनाला तातडीने तो परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पत्र मिळताच जळगाव आर्वी ग्रा. प. प्रशासनाने सुद्धा तातडीने तो दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली आहे.

रामगाव येथील अपंग कर्मचारी छगन पखाले यांनी पुढाकार घेत स्वच्छ केला परिसर 

ग्रा. प. प्रशासनाला आरोग्य विभागाचे पत्र मिळताच दुसऱ्याच दिवशी रामगाव येथील अपंग कर्मचारी छगन पखाले यांनी पुढाकार घेत स्वतः उपस्थित राहून मजुरांकडून पानाच्या टाकीच्या परिसर स्वच्छ करून घेतला.  वास्तविक पाहता गावातील पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही गावातीलच पाणी पुरवठा कर्मचारी यांची असते मात्र गावातील कर्मचारी ग्रा. प. आपल्या खिशातली समजत असल्यामुळे आणि आपण काहीही केलं तरी आपलं काहीच वाकड होत नसल्याच्या हूबाशक्या मारत असल्याने त्याच्या मुजोरपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पाण्याची टाकीचा परिसर जवळपास १ वर्षांपासून साफ न केल्यामुळे चक्क उंचावर ठेवलेल्या टाकीपर्यंत सुद्धा वेल पोहोचला होता. जर गावातल्या कर्मचाऱ्याने वेळीच लक्ष दिले असते तर तो परिसर एवढा अस्वच्छ झाला नसता अशी चर्चा गावात रंगली होती…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!