अपघात अमरावती

दुचाकी अपघातात गर्भवती मातेचा मृत्यू; पती व मुलास दुखापत

डवरगाव ते मोझरी मार्गावर घडली घटना

तिवसा : प्रतिनिधी

डवरगाव ते मोझरी मार्गावर आज (ता. २१) दुपारी दोन वाजेदरम्यान दुचाकीवरून पडून एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरती पंकज गवई (रा. आर्वी, जि. वर्धा), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या हाताला दुखापत झाल्याने पती, पत्नी व मुलगा एमएच ३२ एच ९७७१ या क्रमांकाच्या दुचाकीने अडगाव येथून लेप घेऊन आर्वी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, कापूसतळणी गावानजीक अचानक चालत्या दुचाकीवर ही महिला बेशुद्ध झाली व खाली पडली.
त्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शिरखेड व तिवसा पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाची तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास शिरखेड पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार बच्चू कडू यांनी तिवसा उपजिल्हा रुग्णालयात संबंधित महिलेच्या नातेवाइकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

महिला दोन महिन्यांची गर्भवती

या अपघातात मृत पावलेली आरती पंकज गवई हिचा पंकज सोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षांचा मुलगा असून ती दोन महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे पत्नी व पोटात असलेल मुलं अचानक अपघातात मृत पावल्याने पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!