अपघात धामणगाव रेल्वे

क्रिष्णा पॅलेस हॉटेल समोरील डीपी ला भीषण आग ; ३३ के व्ही केबल जळून खाक

अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण ; एमएसईबी चे मोठे नुकसान

धामणगाव रेल्वे

परसोडी बायपास लगत क्रिष्णा पॅलेस हॉटेल समोरील डीपी ला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ : ३० दरम्यान उघडकीस आली आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही मात्र लागलेल्या आगीमध्ये एमएसईबी प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांमार्फत आग लागल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आली असता अग्निशामक दलाच्या टीम ने तात्काळ घटनास्थळी दाखल होत तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तो पर्यंत डीपी वरील नारगावंडी सबस्टेशन येथील ३३ के व्ही तसेच चांदुर रेल्वे येथील ३३ के व्ही हे दोन्ही केबल जळून खाक झाले आहे. यामध्ये अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अग्निशामक दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविताना 

    दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डीपी जवळील कचरा जाळला असावा त्यामुळे कालांतराने आगीच्या रोद्ररूपात डीपीवरील केबल जळाले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन सचिन कट्यारमल यांच्या मार्गदर्शनात सतीश उईके, प्रशांत रोकडे, हेमंत कापसे यांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी एसएसीबी मधील सहायक अभियंता परेश कन्नाथें, उप कार्यकारी अभियंता राहुल उंबरे, कर्मचारी चंद्रशेखर दमाळे, अनिल बांबल, सुमित टेम्भूर्णे सह इतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!