धक्कादायक धामणगाव रेल्वे

जळका पट ग्रा. प. च्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात राम आणि श्याम चा नाहक बळी ?

 दोन भावांना गमवावा लागला आपला रोजगार ; तिसऱ्यावर सुद्दा कारवाईची टांगती तलवार ?

धामणगाव रेल्वे 

जळका पटाच्या नागरिकांनी सरपंचाने ग्रा. प. मध्ये जवळपास ४५ ते ५० लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी शासन दरबारी केल्या नंतर संपूर्ण प्रकरणाची २ सदस्यीय समिती मार्फत चौकशी अद्यापही सुरु आहे. दरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती आहे. यामध्ये गावातीलच राम आणि श्याम नावाच्या दोन्ही भावाचा नाहक बळी गेल्याचे गावकऱ्यांमार्फत बोलल्या जात आहे.

एकाच कुटुंबातील ३ भाऊ आणि वडील असे ४ सदस्य दाखवून सरपंचाने ग्रा. प. ला लावला लाखोंचा चुना ?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम आणि श्याम हे दोन्ही भाऊ मागील अनेक वर्षांपासून एमएसईबी मध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर होते. मात्र सरपंचाने या दोघांनाही रोजगार हमीच्या कामावर दाखवून लाखो रुपयाचा पगार काढला आहे. सदर घटनेची तक्रार होताच एमएसईबी मधून या दोन्ही भावांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्याने सरपंचाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात या दोन्ही भावाचा नाहक बळी गेल्याची गावातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर तिसरा भाऊ सुद्धा एका नामांकित शाळेत कार्यरत आहे. तर वडील हे टेलर चे काम करीत असल्याचे संपूर्ण गावात माहित आहे. त्यांच्या सुद्धा नावाने रोजगार हमीच्या कामावर दाखवून सरपंचाने पैसे काढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर सरपंचाच्या स्वार्थापायी दोन भावांना रोजगार गमवावा लागला असून तिसऱ्या भावाच्या कामावरसुद्धा कारवाईची टांगती तलवार लटकताना दिसून येत आहे. दरम्यान चौकशी अधिकारी यावर कोणते निष्कर्ष काढतात हे पाहणे देखील तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रमशः ….

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!