क्राईम धामणगाव रेल्वे

धामणगावात चोरटयांनी घातला धुमाकूळ ; गणपती मंदिरातील दानपेटी लांबविली

सातत्याने चोरीचे सत्र सुरूच ; लगाम कधी ?

धामणगाव रेल्वे

शहरातील मुख्य मानल्या जाणाऱ्या शात्री चौक मधील प्रसिद्ध गणपती मंदिरात चोरीची घटना आज दि. २ मार्च रोजी सकाळी उजागर झाली आहे. दरम्यान चोरटयांनी मंदिराचे शटर फोडून चक्क दानपेटीच लांबविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सदर चोरीची घटना १ मार्च च्या मध्यरात्री घडली असून आज सकाळी पुजारी मंदिरात आले असता घटना उघडकीस आली असून दानपेटी ३ महिन्यापासून उघडली नसल्याने अंदाजे ८ ते १० हजारावर चोरटयांनी हात फिरवला असल्याचे मत मंदिर व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती दत्तापूर पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक चव्हाण, कर्मचारी मनोज धोटे घटनास्थळी दाखल झाले होते.

घटनेचा पंचनामा करताना दत्तापूर पोलीस

मागील काही दिवसांपासून सतत चोरीच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सातत्याने चोरीचे सत्र सुरु असल्याने चोरट्यांवर लगाम लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. धामणगावातील मागील काही दिवसापासून धाडसी चोरीच्या घटना पाहता पोलिसांपुढे चोरटे वरचढ ठरत असल्याचे जनसामान्यात बोलल्या जात आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!