धामणगाव रेल्वे

अखेर…. जळका पटाचे ग्रा. प. चौकशीचा मुहूर्त सापडला ; समिती गठीत

६ मार्च ला होणार त्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील मागील २ महिन्यापासुन सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या तसेच सरपंचाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप असलेल्या ग्रा. प. जळका पटाच्या चौकशीचा मुहूर्त मिळाला असून दि. ६ मार्च २०२६ रोजी त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. त्याकरिता गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी निलेश वाघ व गोपाल वानखडे या दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून ६ मार्च ला चौकशी करण्याचे पत्र काढले आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी गावातील समस्त नागरिकांनी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुराव्यासहित ग्रा. प. मधील विविध विकास कामे न करता रक्कम काढण्यात आल्याची तक्रार तसेच अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आला होता. त्याकरिता तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक मुद्द्यांची होणार पोलखोल

तक्रारीत नमूद असलेल्या विषयामध्ये अनेक असे मुद्दे आहे कि, त्यामध्ये चौकशी समितीमधील अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी केल्यास अनेक मुद्द्यांची पोलखोल होणार आहे. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील ४ सदस्यांना मजूर दाखवून लाखो रुपयांचा निधी लाटला गेला तर त्यात भर म्हणून ग्रा. प. सदस्यांच्या पतीचा सुद्दा हात भार लागल्याचे दिसून येते. तर अनेक ठिकाणी कामेच झाली नसली तरीदेखील त्या कामाची रक्कम काढण्यात आली आहे. तसेच ग्रा. प. मार्फत खरेदी करण्यात आलेल्या साहित्यामध्ये सुद्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे दिव्यांगांचा निधी एकाच व्यक्तीच्या खात्यात काढला असल्याचे सुद्धा नमूद आहे.

संपूर्ण ग्रा. प. मधील ८० % कामे एकाच ठेकेदाराला ?

जळका पटाचे ग्रा. प. मधील जवळपास ८० % कामे हि एकाच ठेकेदाराला देण्यात आली असून त्याचे लाखोंचे बिल एकाच्याच नावाने काढण्यात आल्याला प्रकार निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्रा. प. या एकाच ठेकेदारावर मेहेरबान का ? झालेल्या कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शी पार पडली कि, तिथे सुद्धा मनमर्जी कारभार करण्यात आला आहे ? एकाच ठेकेदाराला कामे मिळाल्याने सरपंच आणि ठेकेदाराची मिलीभगत तर नाही ? अशी एक ना अनेक प्रश्न या निम्मिताने उपस्थित होत आहे..
क्रमशः
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!