धामणगाव रेल्वे

अहिंसेचा संदेश अन् भक्तीचा गजर; धामणगाव नगरीत जैन साध्वीजींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

‘आदिमम् मनोहरम्’ वर्षावास २०२६ पर्वाला सुरुवात

धामणगाव रेल्वे

‘आदिमम् मनोहरम्’ वर्षावास २०२६ या मंगलमय पर्वासाठी महत्तमा मनोहर शिशु प्रज्ञानिधी प्रशान्तमना व. वन प्रियंकरा श्रीजी म.सा. आदी ठाणा ६ यांचे शहरात शुभ आगमन झाले असून जैन समाजबांधवांकडून तसेच धामणगावकर यांनी  साध्वीजींचे एका अत्यंत अनोख्या, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले. जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास (वर्षायोग) पर्वानिमित्त भक्तीचा अभूतपूर्व महापूर या निम्मिताने येणार आहे.

जयघोष चा गजर अन् मंगल कलश यात्रा!

चातुर्मास समितीद्वारे साध्वीजीच्या आगमनासाठी शहरातील शास्त्रींचौक ते गांधीचौक पर्यंत भव्य दिव्य असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जैनबांधवांकडून वेशभूषेत ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत रॅलीचा आनंद घेत भव्य मंगल प्रवेश मिरवणुकीत (वरघोडा) पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर मंगल कलश घेतलेल्या शेकडो महिला आणि जयघोष करणारे श्रावक सहभागी झाले असून साध्वीजीचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात केले. या मंगलमय पर्वाच्या सुरुवातीस संपूर्ण जैन समाजात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जैन परंपरेनुसार, पावसाळ्याच्या चार महिन्यांत निसर्गातील सूक्ष्म जीवांच्या रक्षणासाठी आणि ‘अहिंसे’चा संदेश देण्यासाठी जैन संत आपला पायी प्रवास (विहार) थांबवून एकाच ठिकाणी स्थिर राहतात. यावर्षी महत्तमा मनोहर शिशु प्रज्ञानिधी प्रशान्तमना व. वन प्रियंकरा श्रीजी म.सा. आदी ठाणा ६ यांचे धामणगाव नगरीत वास्तव राहणार आहे

आगम अनुपम जैन भगवान वर्धमान महावीर यांची भूमिका साकारताना व इतर चिमुकले 

चार महिने होणार आध्यात्मिक अनुष्ठान

या चातुर्मास काळात दररोज सकाळी साध्वीजींची विशेष अमृतमयी प्रवचने, सामूहिक नवकार जप, उग्र तप-साधना, स्वाध्याय, प्रतिक्रमण आणि युवा व बालकांसाठी विशेष संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने धामणगाव शहराला जणू एका मोठ्या आश्रमाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी चातुर्मास पर्वाला उपस्थित राहण्याचे आवाहन चातुर्मास समिती धामणगाव रेल्वे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!