चांदुर रेल्वे ते अमरावती रोडवरील घटना ; स्वतःच्या गाडीने नेले रुग्णालयात
धामणगाव प्रतिनिधी
अमरावतीवरून धामणगावला येत असताना चिरोडीसमोर एका कार ला ट्रक ने धडक दिल्याने मोठा अपघात झाल्याची घटना निर्दशनास आली असताना तातडीने आमदार प्रताप अडसड यांनी आपले वाहन घटनास्थळी थांबण्यास सांगितले. या अपघातात २ छोटी मुले १ महिला व २ जेष्ठ पुरुष जखमी झाले. अपघातग्रस्तांची विचारपूस करून तातडीने प्रशासनाला सदरहू घटनेची माहिती फोनद्वारे कळवून तातडीने व्यवस्था करण्यास सांगितले.
जखमींना रुग्णालयात दाखल करताना आमदार प्रताप अडसड
सदरची घटना बघता आमदार प्रताप अडसड यांनी अपघात स्थळावरील गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची वाट न पाहता आपल्या स्वतःच्या गाडीने या सर्व जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले. व सर्वोतोपरी मदत करण्यास रुग्णालय प्रशासनाला निर्देश दिले.
सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करून घेईपर्यंत आमदार प्रताप अडसड हे अपघातग्रस्तांसोबत होते…
Add Comment