नजीकच्या एका जिल्ह्यातील युवतीसोबत (वय १९) येथील युवकाची मैत्री झाली होती. त्यानंतर तिला भेटीकरिता अमरावतीत बोलावून शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या युवतीसह अन्य जमावाने युवकाची बेदम धुलाई केल्याची घटना घडली.
शहरातील नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत एका चौकामध्ये ही घटना घडली. जखमी युवकास पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. सय्यद जमीर सय्यद शकील (वय २५), असे जखमी युवकाचे नाव आहे.
पीडित युवतीच्या (वय १९) तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी संशयित सय्यद जमीरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित सय्यद जमीर सय्यद शकील युवकाने चौकात बोलाविले. पीडित युवती ही तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन नांदगावपेठ परिसरात दुचाकीवर बसली असताना संशयित सय्यद जमीर सय्यद शकील याने शारीरिक सुखाची मागणी केली. पीडित युवतीने त्याकरिता नकार दिल्याने सय्यदने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
घडलेल्या प्रकारानंतर पीडित युवती ओरडली असता त्याठिकाणी असलेल्या तिच्या दोन मैत्रिणी पीडितेच्या मदतीसाठी धावल्या. संशयिताने त्यांचासुद्धा विनयभंग केला. हा प्रकार बघून इतर लोकांनी युवकास बेदम मारहाण केली. त्याच कालावधीत कुणीतरी पोलिसांना माहिती दिली.
Add Comment