अमरावती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित पायल गवई ला संविधान रत्न पुरस्कार

अमरावती -प्रतिनिधी 

अमरावती येथील वर्ग १ १ वी मध्ये शिकत असलेली पायल गवई व प्रियांसी गवई वयाच्या पाच वर्षापासून लावणी नूत्य कला शिकत असून नूत्य कला, लावणी, या मध्ये दोघीनी प्राविण्य कमविले असून ३६ व्या ऑल इंडिया डान्स चॅम्पियनशिप, नॅशनल नृत्य स्पर्धा २०२३ हिमाचल प्रदेश, राष्ट्रस्तरीय लावणी स्पर्धा २०२४, विदर्भस्तरीय नूत्य स्पर्धा २०२३, जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा २०२३ अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्यातील सुप्त गुणांना इतरांसमोर मांडले. त्याकरिता ०२ एप्रिल २०२५ ला राष्ट्र सेवा सन्मान (भारत सरकार ) द फेयर व्हिजन फाउंडेशन, फाउंडेर रवी वर्मा यांच्या हस्ते देण्यात आला व वंदे भारत नॅशनल अवार्ड २०२५ हा पुरस्कार मानसी भाजपाई फाउंडेर आणि डायरेक्टर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित संविधान रत्न पुरस्कार २०२५ हा पुरस्कार देऊन या दोन्ही बहिणींचा सन्मानित करण्यात आले.
          पायल गवई आणि प्रियांसी गवई यांनी मिळवलेल्या यशाबद्दल डॉक्टर संघपाल उमरे (पोलीस मित्र महाराष्ट्र शासन संस्थापक ) मनीष गुडदे (वरिष्ठ पत्रकार) अरुण डोंगरदिवे (पत्रकार दैनिकअजिंक्य भारत) सचिन मून (आवाज इंडिया टीव्ही चॅनल धामणगाव रेल्वे ) यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला…
आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय या दोन्ही बहिणीने आपले आई बाबा, वंदना गवई, राजू गवई, त्रिवेणीताई गवई, लक्ष्मी चराटे, सम्राट नेतनराव, नेहा नेतनराव, श्रीष्टी डोंगरे यांना दिले…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!