धामणगाव रेल्वे सामाजिक

उद्या धामणगावात “एक रात्र निळ्या पाखरांची”

रमाई जन्मोत्सव निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे 

महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानव जन्माच्या कल्याणासाठी, हक्कासाठी अर्पण केले, त्यांच्या या कार्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांच्या संगिनी माता रमाई यांचा जन्मोत्सव सोहळानिमित्त उद्या धामणगावात स्व. दादारावजी अडसड व्हॉलीबॉल मैदान, भागचंद नगर, शास्त्री चौक येथे एक रात्र निळ्या पाखरांची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे सह दिपाली इंगळे यांचा बुद्ध भिम गिंताचा महासंग्राम चा दणदणीत कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ वाजतापासून भीमगीताच्या महासंग्रामाला सुरुवात होत असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या सदाबहार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!